Sunday, October 12, 2008

कवीता... मायच बाळ

कवीता ही कवीता असते ... ती चांगली किंवा वांगली नसते. बघणार्याची नजर असते चांगली किंवा वाईट .... कवीता जणू मायच बाळ असत... कवीता ही अभिव्यक्ती असते , कोंडलेल्या वाफेला मिळालेली मुक्ती असते. एकाच मायची दोन लेकरं , तिच्या साठी कशी बरं चांगली अन वांगली असणार? एकाच पान्ह्यातुन भरलेली पोटं, एक असेल शांत अन दुसरं जरा वांड... पण माय साठी दोन्ही सारखीच ना.. आता वांडा कड़े थोड जास्त लक्ष द्यावे लागतच ना.... तसच आहे ह्या कवीतेच पण.... अगदी एकाच दिमागातुन उपज होत असते त्यांची ....कधी कधी ग्रहमान बरे असते मग छान गोंडस बाळ जन्माला याव तशी पॉपुलर होणारी कवीता जन्म घेते.... कधी कधी अगदी मुळ नक्षत्रावर जन्माला आल्या सारखी .... पण तरीही आई आपल्या मुळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाची पण कालजी घेतेच ना...... जरा काकणभर जास्तीच .... अगदी तशीच .... कवीला आपल्या कवितेची...

1 comment:

Harshada Vinaya said...

खरे आहे काका,
म्हणूनच मी जरा जास्त काळजी घेते.कवितांची.
माझी सगळी ग्रहणात जन्माला आलेली पोरं ना!!