Sunday, October 19, 2008

नाते......

काल रात्री मम स्वप्नी आला ...
साक्षात् परमात्मा ..राधेच्या गोकुळीचा नंदलाला ....
होती राधाही सोबतीला ...
बघता गोकुळीच्या या अद्वैताला ....
मनी संतोष अपार झाला .....
मनाशी बांधून खुणगाठ ...
विचार केला करुया बोलते ह्या दोघांना ....
भगवंता तू जरी कान्हा विश्वाचा ,
तान्हा यशोदा माउलीचा ....सारथी त्या पार्थाचा......
परी ना कले मज पामरा कोण तू ह्या राधेचा....
कोण तू ह्या राधेचा ???....
गूढ़ हसुनी तो बंसीधर वदला.....
वत्सा ,अरे मलाही नाही रे कळले ,
कोण मी ह्या राधेचा.... कोण मी ह्या राधेचा???....
हृदयाशी रक्ताचे जे नाते ....श्वासाचे जीवनाशी जे नाते...
लवणाचे जेवणाशी जे नाते ...
गोकुलीच्या राधेशी ते माझे नाते.....
मी वळलो स्वप्नातच राधेकडे..
प्रश्न विचारावा म्हणुन बघितले....
राधेचे ते सलज्ज डोळे....
किन्चितश्या पाणावलेल्या कडा....
शब्दही ना वदता ...
सांगुन गेले काय ते राधेचे कृष्णाशी नाते...
काय ते राधेचे ... श्रीकृष्णाशी नाते...
सुनील जोशी

No comments: