Thursday, October 30, 2008

पिता

पिता जो सिर्फ अपने बच्चो के लिए ही जीते हैं . उन्हे वे सारी सुविधाएं और सुरक्षा प्रदान करते हैं जिनकी उन्हे ज़रूरत होती परंतु क्या वही बच्चे बुढ़ापे मे पिता को वही सारी सुविधाएं और सुरक्षा दे पाते हैं जिनकी ज़रूरत उनके वृद्ध पिता को होती है.क्या फादर्स डे मना कर ही हमे अपनी इतिश्री समझ लेनी चाहिए की इस पर भी कुछ सोचने की ज़रूरत है.

Wednesday, October 29, 2008

माझ्या मेघश्यामा

राधा मी गोकुलीची...बावरी ...
रमले रे मी नीलाईत तुझ्या...
की त्या बासुरीच्या नादात ...
माझ्या मेघश्यामा ..रे माझ्या मेघश्यामा ....
विश्वी त्या विहरता विहरता ....
भासते रे की विसरलास तू मला ...
परी गूढ़ असे ते नाते अपुले
कसा रे विसरु शकशील मला...
मज भास् निरंतर होती ...
की होतसे मी स्वप्नी तव रममाण ...
कले ना मग मज स्वप्न काय अन सत्य काय? ...
काय रे किमया त्या तव नीलकांतीची
अन त्या मधुर स्वर्गीय सुरांची .....
कशी रमते मी रे...
अन जाते होउन एकरूप ...
नकळत मजला मी जाते विरघलुनी त्यात...
भान येता अणिक परती येते ....
मी माझ्या ...हो केवळ माझ्या त्या गोकुळात...
आणिक शोधत बसते रे मी ...
माझ्या हरवलेल्या मेघश्यामा .....
यमुनेच्या नीलडोही .....
नीलकांतिच्या केवळ माझ्या मेघश्यामा.....

Sunday, October 19, 2008

नाते......

काल रात्री मम स्वप्नी आला ...
साक्षात् परमात्मा ..राधेच्या गोकुळीचा नंदलाला ....
होती राधाही सोबतीला ...
बघता गोकुळीच्या या अद्वैताला ....
मनी संतोष अपार झाला .....
मनाशी बांधून खुणगाठ ...
विचार केला करुया बोलते ह्या दोघांना ....
भगवंता तू जरी कान्हा विश्वाचा ,
तान्हा यशोदा माउलीचा ....सारथी त्या पार्थाचा......
परी ना कले मज पामरा कोण तू ह्या राधेचा....
कोण तू ह्या राधेचा ???....
गूढ़ हसुनी तो बंसीधर वदला.....
वत्सा ,अरे मलाही नाही रे कळले ,
कोण मी ह्या राधेचा.... कोण मी ह्या राधेचा???....
हृदयाशी रक्ताचे जे नाते ....श्वासाचे जीवनाशी जे नाते...
लवणाचे जेवणाशी जे नाते ...
गोकुलीच्या राधेशी ते माझे नाते.....
मी वळलो स्वप्नातच राधेकडे..
प्रश्न विचारावा म्हणुन बघितले....
राधेचे ते सलज्ज डोळे....
किन्चितश्या पाणावलेल्या कडा....
शब्दही ना वदता ...
सांगुन गेले काय ते राधेचे कृष्णाशी नाते...
काय ते राधेचे ... श्रीकृष्णाशी नाते...
सुनील जोशी

Monday, October 13, 2008

मम्मी ....I विल Commit.....

काय गं... आज मूड नाही दिसत राणीसरकारांचा?... ऑफिस मधून संध्याकाली परत आल्यावर हसून नेहेमी गुड इविनिंग करून थकवा दूर पलवनारी कन्यका न दिसल्या मुले मी जरा साशंक झालो ....
मी सीनियर राणीसरकाराना विचारत होतो ..पण त्या सुद्धा काही बोलेनात... काही तरी घडलय.. बिघडलय....
मी वाश घेतला .....फ्रेश झालो ..चहा नाश्ता आला... पण मूड काही आलेला दिसत नव्हता ...
आता मी पण जरा आवाज चढ़वून विचारल... अरे मला कलेल का काय झालय ते...
थोडा रुद्रावतार बघून सौ पण फनकारली ...
विचार न विचार आपल्या लाडक्या लेकीला ...दिवटी .... तुम्ही असता दिवसभर बिझी ऑफिस मधे ..ही लावते माझ्या जीवाला घोर ...
अच्छा म्हणजे आज पण काहीतरी झंझट झालेली दिसते आहे... काय झालय ? हं ..सांग बघू ...
अरे माझ तर डोकच काम करत नाहीये ... काय तुमच्या कार्टीच्या demands.. रोज काही तरी नवे...
अरे मग काय झालय ... काय हवय तिला ...दे न .. घेउन येऊ दे ...
पैसे नाहीत का .. मग काढ न आपल्या जोइंट अकाउंट मधून ...
उगा कटकट कशाला करायची. ... फालतू गोष्टीनी मूड कशाला ख़राब करतेस यार...
You know na I am too busy ... hmmm
अरे हो हो ... जरा थाम्बाल का ... ऐकून तर घ्याल ..
No no Nothing Doing ... श्वेताला काय हवय ते आणून दे... no arguments please..
असं का ..मग तुम्हीच पुरवा लाड तुमच्या लाडकीचे.. मला नाही जमणार ...सौ फनकारली...
आता मी पण विचारात पडलो ..बाई साहेब एवढ्या वैताग्ल्या
म्हणजे ..नक्कीच काहीतरी सीरियस आहे तर... मी आवाजाची लेवल झपाट्याने खाली आणली. वैजू काय झालय..? बस बस जरा निवांत ... हे घे पाणी... पी घोट भर ..आणी सांग बघू ...
सौ चे पाणीदार डोळे ...त्यात पाणी तरळले... कष्टाने ते परतावत ती बोलली ... काय हो एक एक हट्ट... लेकीला आता नवा सेल फ़ोन हवा आहे...
काय मी उडालोच .. अगं आताच तर घेतलाय ना ...महिन्या भरापुर्वी... अगदी तिच्या choice चा ..
मग... ते मॉडल म्हणे Outdated झालय ... नविन PDF फ़ोन हवा आहे तिला ...
अरे मग tevha का नाही बोलली ... आत्ताच तर १४ हजार रुपये खर्च केलेत की ... जेमतेम महिन्या भरा पूर्वी...
अहो मी पण तेच तर म्हणते आहे ... प्रश्न पैश्याचा नाही हो ... पण इतकी धरसोड वृत्ती ...
मला तर बाई काही सुचत नाहीय्ये...फार शेफारली आहे ती..
माझ्यावर तर वसकन धावून येते...काही बाहीबोलते हो ती..
मला तर धमकीच देत असते .. म्हणे मम्मी ....I विल Commit.....
आता हिला शब्द पण उच्चारणे कठीण झाले होते... आणी मी शुन्यात बघत राहिलो...

post scrap cancel


post scrap cancel

Sunday, October 12, 2008

काय चालल आहे ह्या माझ्या देशात.....

काय चालल आहे ह्या माझ्या देशात.....
काय चालल आहे ह्या माझ्या देशात..
इथे कोणीतरी माथेफिरू उठतो मध्यरात्री ...
बाबासाहेबांच्या पुतल्याला काले फासतो...
कमी वाटते की काय म्हणुन ....
वरुन फाटक्या जोड्यान्चा हार पण घालतो.....
बाबासाहेब काही लहन होत नाहीत..पण...
पण मग सुरु होते एक दंगल ...होरपळ..
ज्यांना काही देण-घेण नसते , माहीत नसते ...
त्यांची होरपळ त्यांची फरफत...
आईला कालजी शालेतुं परत येणार्या लेकरांची ...
कामावरून घरी येऊ घातलेल्या घरधन्याची ...
काय चालल आहे ह्या माझ्या देशात.. बंगलोर , जयपुर, अहमदाबाद, मुंबई... अजुन.????
सगला देश स्फोटक , परीस्थीती विस्फोटक...
राज्यकर्ते म्हणतात संयम बालगा .... बालगतो...
कधी बसलाय का चटका ह्यांना दंगलिचा? ...
किती सोपा असते ऊंटावरुन शेल्या हाकने..
सरकारी कोशातुन चार दोन लाख वाटले की झाले...
करू शकाल का भरपाई त्या वहानारया आसवांच्या महापुराची?
काय चालल आहे ह्या माझ्या देशात..
अमरनाथाची जमीन..परत एक नवा गोंधळ ...
एक नविन आन्दोलन एक नवा वैताग...एक लाठीमार...
एक गोलीबार बार ठारपरत जन्सामान्यान्ची होरपळ...
राम सेतुचा वाद .... परत एक नवा गोंधळ ...
अरे आहेत ना इतर पर्याय उपलब्ध ....
पण मग आम्ही Extreme उजवे आणी Extreme डावे..
जगु आणी तगु कश्याच्या भरवशावर ....
सरकार घालते जणू खतपाणी ह्या अनोख्या अजब दहशतवादाला ...
आणी करते आहे त्यांचे भरण-पोषण ....
काय कराव जनसामान्यानी....
इथे असे तर तिथे तसे..
ह्या सुवर्ण भूमीला लागलय ( की लावलय..??)
ह्या अजब अनोख्या दहशतवादाच ग्रहण ...
कधी सुधारणार आम्ही ?
अरे जीते गज्वायाच तिथे घालता शेपुट ...
आणी नको तिथे काढतो फना
खेलात राजकारण आणी राजकारणात खेल ...
काय चालल आहे ह्या माझ्या देशात..

कवीता... मायच बाळ

कवीता ही कवीता असते ... ती चांगली किंवा वांगली नसते. बघणार्याची नजर असते चांगली किंवा वाईट .... कवीता जणू मायच बाळ असत... कवीता ही अभिव्यक्ती असते , कोंडलेल्या वाफेला मिळालेली मुक्ती असते. एकाच मायची दोन लेकरं , तिच्या साठी कशी बरं चांगली अन वांगली असणार? एकाच पान्ह्यातुन भरलेली पोटं, एक असेल शांत अन दुसरं जरा वांड... पण माय साठी दोन्ही सारखीच ना.. आता वांडा कड़े थोड जास्त लक्ष द्यावे लागतच ना.... तसच आहे ह्या कवीतेच पण.... अगदी एकाच दिमागातुन उपज होत असते त्यांची ....कधी कधी ग्रहमान बरे असते मग छान गोंडस बाळ जन्माला याव तशी पॉपुलर होणारी कवीता जन्म घेते.... कधी कधी अगदी मुळ नक्षत्रावर जन्माला आल्या सारखी .... पण तरीही आई आपल्या मुळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाची पण कालजी घेतेच ना...... जरा काकणभर जास्तीच .... अगदी तशीच .... कवीला आपल्या कवितेची...

प्राक्तन

मी लहान होते. मला सगळ जग छान वाटायचे. येणार्या काकांकडे मी चोकोलेट चा हट्ट धरायची. त्यांना पण माझे लाड करायची हुक्की यायची. एका चोकोलेट करीता एका पप्पिची डिमांड .... मला सौदा पटायचा ......पटकन त्यांच्या मांडी वर बसून एक पप्पी द्यायची आणी एक चोकोलेट त्यांच्या खिशातून वसूल करायच....
पप्पाना कौतुक वाटायच. मम्मीला मात्र राग आलेला असायचा. तेव्हा तिला काही बोलता येत नसे. काका निघून गेल्यावर मात्र ती माझ्यावर डोळे वटारून पप्पांशी भांडण करायची ... अंधुक अंधुक आठवत. म्हणायची साम्भाळा पोरीला हो . नंतर out of control गेली की आहेच आईचा उद्धार .... वगैरे वगैरे.... पण ते ऐकायला मी इथे असायचीच कशाला ... आपण आपले साईं सुट्यो ....
वयं वाढत होती. आता चोकोलेट्स ची जागा गिफ्ट्स नी घेतलेली ... पण सवय मात्र तीच ... लाचखोरीची.. मात्र आता लपून छपुन.... कळत न कळत फसत गेले... आज ह्या वळणावर आहे की काही कळत नाही काय करू.. अस वाटते .... बाबा का हो तुम्ही तेव्हा प्रोत्साहन दिलत .... आई का ग तू मला तेव्हा नाही धरून ठेवलस? शेवटी तेच घडायाच असते .... जे आपल्या प्राक्तनात असत... असच ना....

Saturday, October 11, 2008

व्यक्त मी अव्यक्त मी....

व्यक्त मी अव्यक्त मी....
व्यक्त मी अव्यक्त मी....
जनमानसात वावरतो मी तो व्यक्त मी... व्यक्त मी...
मन मानसी असतो तो अव्यक्त मी ....अव्यक्त मी ...
वावरता जन मानसी लपवितो माझा मलाच मी...
एक नसलेला माझा चेहरा पांघरून जगत असतो सतत मी.....
असते जगायाचे मला एका मुक्त योग्या परी..
नवजात शिशुच्या नैसर्गीक हास्यापरी.....
परी समाज बंधनी बंधीत मी जगत असतो एका कैद्या परी....
अपरीचीत माझा मलाच मी...
परी जन मानसी द्सितो तो व्यक्त मी.... व्यक्त मी....
मी नाही असा जन मानसी दिसतो जसा..
माझ्या कवितेतून शोधतोय मला माझा मी ....माझा मीच....
तो जो शोधतोय माझा चेहरा ...
चंद्राच्या दुसर्या बाजुचा....
अव्यक्त मी....अव्यक्त मी.....

करा हो परोपकार करा

जीवन म्हणजे काय ? माझा श्वास सुरु आहे तो पर्यंत मी आहे .... श्वास थांबला की मी थाम्बेन... मग मी थाम्बल्या वर काय? माहीत नाही .... मी चिंता करत असतो ....कशाची..कोणाची... माहीत नाही... समजत नाही ... ह्या चिंतेने काय होते आहे ..... माझा मीच जळत असतो... माझ्या सुह्रुदान्ना काळजी वाटते.... पण ते काही करू शकत नाही... मला जळन्या पासून ते थाम्बवु शकत नाहीत ... मग काय होते ...ते सुद्धा माझ्या सोबत जळत रहातात ..... हे कुठे तरी थांबले पाहिजे ... कसे काय थांबेल? मग त्याच्या शोधात आहे मी. ....तुम्ही सुचवा .... मी प्रयत्न करेन ...आता तुम्ही म्हणाल आम्ही का सुचवू? ....अरे एक सामाजीक जबाबदारी म्हणून? समाजातले एक घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचे पुण्य पदरात पाडून घ्या ... किती मोठी संधी आहे तुम्हाला परोपकार करण्याची ....करा हो परोपकार करा
Hello Every body 
This is my first attempt to blog down what I feel. 
I don't know basically what n how to write down here.

मनामनातल्या गोष्टी लिहितांना बरयाच गोष्टी ह्या आपल्या आसपास घडतानना दिसतात .... 
पण त्यांना गोष्टीचे स्वरुप देण्याचा हा प्रयत्न ..... बघू या माझ्या  मित्रांना कसा काय भावतो ते