Wednesday, November 11, 2009

मन राधेचे

श्यामल मेघांवरी त्या
सप्त रंगांची ऊधळण होते
मनी अचंभित राधा
निसर्ग नवलाते न्याहाळीते

फूलता विविध रंगी तो
मोरपिसारा त्या काननाते
इंद्रधनुष्यी मन राधेचे
झनक झनक थिरकते ....

किंचित चिंतित ती राधा
त्या सख्या हरिसी शोधिते
ना दिसता ती भय व्याकुळ
त्या कदंब डोही डोकाविते

थाम्बे तो मेघ ही वर्षता
अन् सूर्य ढगा आडुनी पाही ते
शामल कांति आकाशी दिसता
हर्षित राधा ती वेडावते

वेड्या त्या राधेसिं बघता
धुन मुरलीची उमटते
सुरेल धुन ती कानी पङता
गोकुळ हरिमय होई ते....

अन् मग .....

इंद्रधनुष्यी मन राधेचे
झनक झनक थिरकते ....

सुनील जोशी
१०/११/२००९

इथे मी स्वताला राधा स्थानी कल्पुन हां अनुभव घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे .प्रयत्न कृष्णार्पणमस्तु ..........

1 comment:

शेखर जोशी said...

सुनीलजी
नमस्कार
मनामनातल्या गोष्टी या खरोखरच मनात घर करणाऱया आहेत. आपल्या ब्लॉगसाठी शुभेच्छा.
जमल्यास माझ्याही पुन्हा एकदा जोशीपुराण या ब्लॉगला भेट द्या आणि आपली प्रतिक्रिया जरुर कळवा. ब्लॉगची लींक अशी
http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com

शेखर जोशी