Sunday, October 4, 2009

ब्राह्म मुहूर्त ...

ब्राह्म मुहूर्त ...

अवसेची रात...
किर्र आवाज...
अन् भयाणता वाढवणारा
कूट्ट अंधार

दुरवर मिणमिणता दिवा
झोपडीत दाट्लाय धुर
धुरात खोकत.. भाकरी थापत
बसलेली ती... पाठमोरी..

त्याची एंट्री ...भेलकांडत....
एका लाथेत भाकरीचं टोपलं...
आकाशाला गवसणी घालायला निघालयं

एक अर्वाच्य शिवी हासडत ....
दूसरी लात तिच्या पेकाटात
रात किड्यानच्या किर्र आवाजाला
चिरत जाणारी एक आर्त किंकाळी

आदळ आपट ... झटापट...
एक नीरव शांतता ....

फटफटतयं ....
तयारी एका महाप्रयाणाची ....
सरत्या अवसेच्या ब्राह्म मुहुर्तावर ...

सुनील जोशी
०२/१०/२००९

No comments: