Sunday, October 4, 2009

नाही म्हणजे नाही ...

नाही म्हणजे नाही ...

जन्माला तो आला
रडतच पैदा झाला
आईने वटारले डोळे
अन् म्हणाली नाही
नाही म्हणजे नाही

सगळे होते हसत
तू पण हसत राही
आता रडलास ते रडलास
आता रडायाचे नाही
नाही म्हणजे नाही

लहान बाळ तो पण
धाक किती बाई
भूक लागली कळवळुन
तरी रडायचा नाही
नाही म्हणजे नाही

अत्यंत शिस्तीत
आईच्या कड़क
लहानाचा मोठा
तो होत जाई
सगळे कसे आखीव
बदल मुळी नाही
नाही म्हणजे नाही

आई सांगेल ते प्रमाण
त्याच्या बाहेर दुनिया नाही ...
दोस्त मित्र चिडवित
मामा'स बॉय म्हणत
हरकत नाही ...
पण आईने सांगितले ना
नाही ....
नाही म्हणजे नाही ...

कधी तरी वाटायचं
बर्फाचा गोला खावा ...
पानीपूरी खावी ...
पण आईने सांगितले
तब्येत ख़राब होई
म्हणून खायचे नाही ..
नाही म्हणजे नाही ...

अजुन मोठा झाला ..
कॉलेज ला आला
घरचा जरा रईस ...
मित्र झाले गोळा
आई ने सांगितले ..
ह्याचाशी कर मैत्री
अन् त्यांच्याशी नाही ....
नाही म्हणजे नाही ..

प्रेम पण त्याने केले
आईने सेलेक्ट केलेल्या मुलीवर,
जीचे त्याच्यावर प्रेम होते
ती आईला चालत नव्हती
आईने सांगितले ही चालेल
ती नाही
नाही म्हणजे नाही ...

यथा वेळी संसार ही थाटला
बायको पण आली ....
तिच्या बरोबर सिनेमा ला जाऊ का
आईला विचारी
आई म्हणाली नाही
नाही म्हणजे नाही ...

काय गं तू आई
माझा गं अगदी
कसा बोन्साय केलास ...
एक पण निर्णय
मला कसा घेता येतच नाही?
नाही म्हणजे नाही ...

खरच गं अगदी नाही
नाही म्हणजे नाही ...

सुनील जोशी
१८/०६/२००९

No comments: