Sunday, October 11, 2009

धारा ३०२.......

धारा ३०२.......

इंडियन पीनल कोड च्या धारा ३०२ अन्वये आपल्यावर कु. जाई गजानन सरकार हिच्या खुनाचा, सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दखल करण्यात आलेला आहे. सदर आरोप आपल्याला मंजूर आहे का? .....

भरगच्च न्यायालयात नीरव शांतता पसरली. अगदी मुंगीच्या पायातील घुंगरांचा पण स्पष्ट आवाज येइल इतकी नीरव शांतता....

आरोपी गजानन महादेव सरकार .... वय वर्षं ४८.. गजानना च्या डोळ्यात पानी तरळले ... गुन्ह्याच्या शिक्षेच्या भयाने नाही, त्याने केलेल्या कृत्याच्या पश्च्यातापाने नाही, फ़क्त आठवणीन्नी ... फ़क्त आठवणीन्नी.. आठवणी ज्या त्यान जोजवुन ठेवल्या होत्या त्याच्या लाडक्या लेकीच्या...एकुलत्या एका लाडक्या लेकीच्या... ती लेक जिला त्यान जपलं होतं तळ हातावरील फोड़ा प्रमाणे... वाढवलं होतं तिची आई आणि बाप होवून..

जाई ...स्व. जाई गजानन सरकार .... वय वर्षं २३ ... त्या दिवशी संताप अनावर झाला ... क्षण भरा पूर्वी होती ...मग नव्हती ..संपली... कायमची...

सहन होत नाही कल्पना ..जाई तू नाहीस.... खरच नाहीस...

का केलस असं तू जाई? का? का? का ? ........

अग आता इच्छाच नहीं उरली बघ कशा कशा ची... येतोय बेटा तुला भेटायला ..लवकरच मी पण ...मूक रुदन करत गजानन मनातल्या मनात म्हणत होता जणू....

२० में १९८६ ...

डॉक्टर कोठेकरान्चं हॉस्पिटल ...
सौ रमा गजानन सरकार प्रसूति गृहाच्या प्रसूति कक्षात दखल झालेली होती . बाहेर गजानन अस्वस्थ पणे येरझारया घालत होता. सुटका सुखरूप व्हावी म्हणून चालता चालता मनातल्या मनात अथर्वशीर्ष पठण सुरूच होतं.

टयांह टयांह ... बारीक़ चिरकासा आवाज , मग नर्स ची लगबग ... आतबाहेर ..धावपळ गजानन ची उत्सुकता शिगेला पोहोचलेली ...

मुलगी झाली ... गजानन च्या चेहेर्यावर असीम आनंद...

थोड्या वेळा नंतर नॉर्मली डिलिवर्ड बेबी आणि रमा प्रसूति कक्षाबाहेर आणल्या गेल्यात... लगेच स्पेशल रूम मधे .....

बघ लबाड कशी हसते आहे ....

ओळखायाला लागली आहे बाबाला तिच्या ...

गजानन ला उगीच मूठ भर मासं चढलं ....

गजानन एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर ... हुशार असल्याने भर भर प्रमोशन मिळालित ..व्यसन फ़क्त कामाचं ... प्रचंड ताणा खाली पण सतत उत्कृष्ट काम करत करत आज कंपनी चा एक महत्वाचा घटक झालेला ...
इतका व्यस्त आणि ताणा खाली असायचा ... पण लहानग्या जाई ला बघितलं की त्याचा ताण... थकवा कुठल्या कुठे पळुन जायचा...

हळु हळु जाई मोठी होवू लागली ...तिच्या बाल लीला मधे दोघे ही दंग होवून जात . शाळेत जायला होती नुकतीच जाई .... शाळेची परीक्षा होती ..आणि नेमकं त्याच वेळी सासुबाईना अटैक आला ... काही उपचार व्हायाच्या आतच सगळ संपलं. मग तिकडे जावचं लागलं जाई ला परीक्षेला बसताच आलं नाही. परीक्षा बुडाली.

तिकडून परत आल्यावर शाळेत गेली तो दिवस नेमका निकालाचा ... सगळ्या मुलांना निकालाचा कागद मिळाला... पण परीक्षेला बसलीच नव्हती त्यामुळे जाई ला निकालाचा कागद दिलाच नाही तिच्या मैडम नी...
कोण गोंधळ घातला होता तिने रडून रडून ... त्या कागदा साठी.. दुसरया दिवशी रजा घेवून गजानन तिच्या शाळेत गेला .... तिच्या मैडमला भेटून त्याने एक मार्क शीट कोरी घेतली ..शुन्य गुण भरलेली .... काय खुश झाली होती ती....

जाई हळु हळु वाढत होती ... नावा प्रमाणेच नाजुक आणि सुन्दर ... चेहरा बोलका ...त्यात डोळे हे तर फारच बोलके .... तारुण्यात पदार्पण करणारी जाई बघून जाणार्या येणार्याच्या काळजाचा ठोका चुकत असे...
जाई १० वी ला होती . १० वी ची परीक्षा आटोपली ..पेपर छान गेले होते .. ..अचानक रमाची तब्येत बिघडली ... धावपळ झाली ..तपासण्या केल्यात ...आणि हिमोग्लोबिन निघालं फ़क्त % ... सगळे हादरले .... अजुन तपासण्या केल्यात ...
निदान झालं .."Acute Myloid Lukemia " चं
काही उपचार व्हायच्या आतच गजानन आणि जाई ला सोडून रमा अनंताच्या प्रवासाला निघून गेली...
विस्कटलेला गजानन सावरल्या सारखा दाखवित होता ... दुखःच्या डोंगरा आडून आसेचे किरण शोधत होता .... जाई च्या मामा ने खुप साथ दिली ... खुप समजावून सांगायचा तो जाई ला ..कधी येउन , राहून ..तर कधी फ़ोन वर बोलून.... जसं जमेल तसं...
जाई आता १२ वी ला होती ... कामात लक्ष देत देत गजानन जाई वर विशेष लक्ष देत होताच ... तिला काय हवय... वेळो वेळी काळजी घेत होताच ... तिच्या आवडी निवडी विशेष जपत होता ...
तिच्या परिक्षेच्या वेळी विशेष सुटी घेवून १० दिवस गजानन पूर्ण वेळ तिच्या सोबत होता . परीक्षा छान झालीच आणि पेपर छान गेलेत.
निकालाचे टेंशन नव्हतेच ... अपेक्षेप्रमाणे बोर्डातुन दूसरी आणि मुलीं मधे पहिली आली होती जाई...
गजानन च्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले ... रमाच्या फोटो समोर उभे राहून मूक रुदन सुरु होतं बाप लेकिचे...

जाई ला इंजीनियरिंग ला एडमिशन मिळाली. लाम्ब दुरवर च्या गावाला . काळजचा हा तुकडा आता इतक्या दूर जाणार म्हणून गजानन हवालदिल झाला होता . आता वर्ष वर्ष लाडूबाई दिसणार नाहीत ...आतून कासाविस झाला होता तो... पण छातीवर धोंडा ठेवून त्यान निर्णय घेतला .... जाई ची एडमिशन झाली . आणि तिला सहजच हॉस्टल पण मिळालं.

कॉलेजच वातावरण एकदम मस्त् .... सगळ कसं नविन नविन . बंदिस्त पाखराला मिळालं एक मुक्त वातावरण ... जात्याच हुशार असलेली जाई .... इकडे फुलू लागली ...

जाई ला मोबाइल घेवून दिला . सकाळ संध्याकाळ गजानन तिच्याशी बोलायचा. दुधाची तहान ताकावर भागवयाचा. सगलं ठीक ठाक आहे असे ऐकून हळुवार निश्वास सोडायचा.

रैगिंग.... इंट्रो..... फ्रेशर्स डे.... सीनियर्स चा रिस्पेक्ट .... अरे बाप रे हें सुद्धा पैलू असतात तर... काही पर्याय नाही ह्यातून सूटण्याचा... असो ..आली या भोगासी .... आपण पण सीनियर्स होणारच की पुढच्याच वर्षी... मग बघून घेवू एकेकाला ....

आज उभं राहून राहून पाय कसे मोडकळीला आले होतेत. रूम वर जावून पडून रहावसं वाटत होते. मेस वर जेवण करून झप झप पावलं टाकत जाई रूम कड़े जात होती . बघते तर काय रूम समोर ही गर्दी. थर्ड सेम च्या मुली त्यांच्या विंग मधे गोळा झालेल्या ..तिच्या पार्टनर ला झापत होत्या ...

जादा स्मार्ट बनतेस काय? जास्तीच शहाणी दिसतेस...
चल वाक् गुढघ्यात. लवकर ...टाइम पास नाही करायचा

नाईट ड्रेस मधली सावनी रडकुंडीला आली होती ...
खाली वाकताच तिच्या टोपच्या V मधून एकीने तार आत टाकली ... सावनी कळवळली..

जाई ला राहवेना ..अन् काही बोलता पण येई ना...

तितक्यात आवाज आला ... मैडम आल्यात .... एका क्षणात सगळा चिवचिवाट थांबला. क्षण भरात सगळ्या अंतर्धान पावल्यात अन् कसला गोंधळ करते गं असं म्हणत मैडम ने त्या दोघिन्नाच रागावलं वरून ....

सावनी ची तब्येत बिघडली .ती आठवडा भरासाठी सुटी वर गावाकडे निघून गेली . आज जाई रूम वर एकटीच होती . सबमिशन चं काम पूर्ण करत बसली होती . नुकताच बाबाचा फोन येवून गेला होता . तिन एक्सपेरिमेंट लिहून झालेत . रात्रीचे साडे अकरा वाजत आले होते. मैडम चा राउंड होवून गेला होता. सगळ्या जणी झोपी गेलेल्या...सगळ कसं शांत शांत होतं ..

दारावर टक टक आवाज झाला ...जाई चा थरकाप उडाला . कोण असेल इतक्या उशिरा? ... पाय जड़शीळ झालेत ... उठावसचं वाटेना ... दारावरची टक टक वाढली ..एका लयीत... नाईलाजाने जड़ पावलानी जाई उठली. दार उघडलं . दारात फिफ्थ सेम ची ताई उभी होती . काहीच बोलली नाही. अक्ख कोरिडोर रिकामं होतं . सगले लाइट्स बंद... तीने आत येवून दाराला कड़ी घातली ...

काय गं काय सुरु आहे तुझं? ऐसपैस बसत ताईन विचारलं.... चाचरत चाचरत जाई बोलली सब मिशन आहे माम.... हं हं ठीक आहे ..आटप लवकर

मी आज इकडेच झोपणार आहे हं ... तुझी पार्टनर नाहीय्ये ना ... चल आटप लवकर आणि मालव दिवा .. तशी पण जाई ला झोप आलीच होती थोडसं आवरून तिने दिवा मालवला. ..आणि जाई पण झोपी गेली ...

अर्धवट झोपेत जाई ला हालचाल जाणवली. नको तिथे नको ते स्पर्श ... जाई वैतागली ... जाई कातावली ... अणि मग जाई हरली....

आताशा जाई ताई ची ख़ास म्हणून ओळखल्या जावू लागली.सीनियर्स पण तिला टरकुन असत. वर्ष उलटलं. सुट्यात घरी आलेली जाई हरवल्या हरवल्या सारखी वाटत होती . गजानन ला वाटले की आई ची आठवण येत असेल . कोमेजली बिचारी. तिच्या साठी काय काय करयाचे ते करून बघितले ... पण जाई चा अनुत्साह काही निघेच ना.

सुट्या संपताच तिची कळी खुलली. हॉस्टल ला परत जायच्या नुसत्या कल्पनेनेच ...

बघता बघता वर्षं होत आलित ..दर वेळिच्या सुटीत जाई चा अलिप्त पणा वाढतच होता ...
कैम्पस इंटरव्यू मधे तिचे सिलेक्शन झालं मुंबई ला एका कंपनी मधे ...ताईच्याच कंपनी मधे ...आणि आता ती चक्क ताईच्याच बरोबर तिच्या फ्लैट मधे राहू लागली.

गजानन पण आताशा थकत चालला होता. वय फार नसलं तरी दगदग सहन नव्हती होत त्याला. मुलीचे दोनाचे चार झालेत की बरं अस वाटायला लागलं होतं त्याला ...

त्याने मित्रान्मधे विषय काढला .. अरे माझ्या बहिणीचा मुलगा आहे ..स्टेट्स ला असतो
गजानन पण आनंदला. त्याने उत्साहांने जाई चा फोटो , पत्रिका दिली मित्राला . योग योग पण कसा ..पहिल्याच स्थळाला पत्रिका जुळाली ..फोटो आवडला ... पुढच्या कार्यक्रमा करीता पसंती आली ....
गजानन ने उत्साहाने जाई ला बोलावून घेतले अर्जंट मधे ... जाई आली पण फण फण करतच. बाबाच्या समाधानासाठी आणि पाहुन्यांच्या समोर तमाशा नको म्हणून तिने सगळे सोपस्कार करवून घेतलेत ....
मग तिने गजानन ला सांगितले ...बाबा हे लग्न होणार नाही...

गजानन हादरला .... समजावून सांगू लागला ...चिडला , रागावला ... तापला ...अणि रागाच्या भरात कपाटामधुन बारा बोर चं पिस्तूल घेवून आला ....

बोल करणार की नाही? स्वताच्याच कनपटी वर नळी ठेवत तो म्हणू लागला...

इतक्यात एक झटका देत जाई पुढे आली. त्याचं पिस्तूल हिसकलं आणि स्वताच्या कनपटी वर ठेवून घोड़ा दाबला पण ... एक भयानक आवाज मग एक किंकाळी अन् मग सगळी शांतता .

गजानन वेड्यागत झाला ... बरळु लागला .... मी मारलायं माझ्या लेकीला ... फाशी द्या हो मला फाशी द्या ....

मग पुढचे सोपस्कार पार पडलेत ...... गजानन ... मात्र एकदम मुका झाला .... नेहेमी करताच....

सुनील जोशी
०८/१०/२००९

Sunday, October 4, 2009

नाही म्हणजे नाही ...

नाही म्हणजे नाही ...

जन्माला तो आला
रडतच पैदा झाला
आईने वटारले डोळे
अन् म्हणाली नाही
नाही म्हणजे नाही

सगळे होते हसत
तू पण हसत राही
आता रडलास ते रडलास
आता रडायाचे नाही
नाही म्हणजे नाही

लहान बाळ तो पण
धाक किती बाई
भूक लागली कळवळुन
तरी रडायचा नाही
नाही म्हणजे नाही

अत्यंत शिस्तीत
आईच्या कड़क
लहानाचा मोठा
तो होत जाई
सगळे कसे आखीव
बदल मुळी नाही
नाही म्हणजे नाही

आई सांगेल ते प्रमाण
त्याच्या बाहेर दुनिया नाही ...
दोस्त मित्र चिडवित
मामा'स बॉय म्हणत
हरकत नाही ...
पण आईने सांगितले ना
नाही ....
नाही म्हणजे नाही ...

कधी तरी वाटायचं
बर्फाचा गोला खावा ...
पानीपूरी खावी ...
पण आईने सांगितले
तब्येत ख़राब होई
म्हणून खायचे नाही ..
नाही म्हणजे नाही ...

अजुन मोठा झाला ..
कॉलेज ला आला
घरचा जरा रईस ...
मित्र झाले गोळा
आई ने सांगितले ..
ह्याचाशी कर मैत्री
अन् त्यांच्याशी नाही ....
नाही म्हणजे नाही ..

प्रेम पण त्याने केले
आईने सेलेक्ट केलेल्या मुलीवर,
जीचे त्याच्यावर प्रेम होते
ती आईला चालत नव्हती
आईने सांगितले ही चालेल
ती नाही
नाही म्हणजे नाही ...

यथा वेळी संसार ही थाटला
बायको पण आली ....
तिच्या बरोबर सिनेमा ला जाऊ का
आईला विचारी
आई म्हणाली नाही
नाही म्हणजे नाही ...

काय गं तू आई
माझा गं अगदी
कसा बोन्साय केलास ...
एक पण निर्णय
मला कसा घेता येतच नाही?
नाही म्हणजे नाही ...

खरच गं अगदी नाही
नाही म्हणजे नाही ...

सुनील जोशी
१८/०६/२००९

कल्पांत ...... होणारच नाही....

मी ठरवल आहे की
मी वाट बघणार आहे
कल्पांत होणार नाही
कारण तू येणार नाही

मी ठरवल आहे की
तू येणार नाहीस
कारण ....
मला जगाची काळजी आहे
एकट्या माझीच नाही

कल्पांत झाला तर ...
तर मी राहणार नाही
तुही राहणार नाहीसच

तुझ्या येण्याने जर
असेल होणार कल्पान्त
तर ...
तर मी तुझी वाट बघणार नाही

आणि म्हणून मी ठरवून टाकलय
की आता कल्पांत होणारच नाही ....

सुनील जोशी
१/१०/२००९

काही चारोळ्या ....

1.
मोगरा फुलतो
सुगंध दरवळतो
आठवणी जागवतो
तुझ्या नि माझ्या ....

2.
आठवणी तुझ्या नि माझ्या
आपल्या पहिल्या प्रितीच्या
साक्षीला अन् होता तो
गंध धुंद मोगरा .........

3.
गंध वेडी तू
अन् मी बेधुंध...
फुलली प्रीत अशी
साक्षीला मोगरा ....

4.
मोगर्याने अन् काय केले?
तुला सजवले, मला फसवले
इश्कात जाहलो वेडे असे की
तू न् मी वेगळे ना उरलो ....

5.
इश्काची किमया अशी की
वेडावुनी पुरती ती गेली
सांज सकाळ ना कळाली
क्षणा क्षणात फ़क्त तीच उरली

6.
तीच उरली असे वाटले
वाटुनी असे ही गेले ....
नसती जर का ती तरी
मग काय असते जाहले ?

7.
काय हो होणार आहे
प्राक्तना पलिकडे ...
परी विचार मी करू कशाला
हेच झाले जे सुप्राक्तन माझे

8.
प्राक्तन ..ते ही असे का?
सुप्राक्तन अन् कुप्राक्तन असे
पण मी कशाला करू चिंता
नको नको त्या प्राक्तनाची?

9.
चिंता ... चिंता अन् चिता
भेद फ़क्त अनुस्वाराचा
जाळती दोन्ही परी
एक सजीवा अन् एक निर्जीवा ...
( मूळ संस्कृत सुभाषित आहे )

सुनील जोशी
३/१०/२००९

त्या जंगलात ....

त्या जंगलात ....

भर दुपारी
नीरव शांतता
मैलभरावरच्या नदीच्या
लाटान्चा सुस्पष्ट खळखळाट

त्या जंगलात ...
भर दुपारी .. अंधार गुप्प
तळपत्या वैशाखात
झेलुन वरच्या वर
केली किरण बंदी .........

त्या जंगलात ...
शोधासाठी मी अतार्क्यच्या
त्याच वेळी पावलान्वरून
एक सळ सळ
एक थंड स्पर्श ...
गोठवणारा .....

त्या जंगलात
कधी आणि केव्हाही
एकोपा ..सगळ्या सगळ्यान्चा
पण लागली आहे चाहुल
एका नष्टचर्याची ...
माणुस शिरलाय म्हणे जंगलात ....
त्या जंगलात

सुनील जोशी
२/१०/२००९

ब्राह्म मुहूर्त ...

ब्राह्म मुहूर्त ...

अवसेची रात...
किर्र आवाज...
अन् भयाणता वाढवणारा
कूट्ट अंधार

दुरवर मिणमिणता दिवा
झोपडीत दाट्लाय धुर
धुरात खोकत.. भाकरी थापत
बसलेली ती... पाठमोरी..

त्याची एंट्री ...भेलकांडत....
एका लाथेत भाकरीचं टोपलं...
आकाशाला गवसणी घालायला निघालयं

एक अर्वाच्य शिवी हासडत ....
दूसरी लात तिच्या पेकाटात
रात किड्यानच्या किर्र आवाजाला
चिरत जाणारी एक आर्त किंकाळी

आदळ आपट ... झटापट...
एक नीरव शांतता ....

फटफटतयं ....
तयारी एका महाप्रयाणाची ....
सरत्या अवसेच्या ब्राह्म मुहुर्तावर ...

सुनील जोशी
०२/१०/२००९