Tuesday, April 28, 2009

आता मी ठरवून टाकलय

आता मी ठरवून टाकलय की स्वताच्या मनाप्रमाणे वागायचे नाही....
कुणा कुणाला दुखवायाचे नाही अगदी कुणालाही दुखवायाचे नाही
काय असते न की स्वताच्या मनाप्रमाणे वागल ना की
बरेच जण दुखावल्या जातात अगदी नकळत ........
माझ्या मनात पण नसते त्यांना दुखः द्यायचे
पण मग ते तर दुखावतातच ना...
त्यांच दुखः मग मला बघवत नाही आणी सहन पण होत नाही
त्यांना दुखी बघून ना मला पण दुखः च होते
पण ते मी त्यांना नाही ना दाखवू शकत
तसही दुखाचे प्रदर्शन करायला मला काही आवडत नाहीच
पण काय आहे ना मग त्याचा मला पण खुप खुप त्रास होतो
मग कशाला आपण स्वताला त्रास करवून घ्यायचा ?
त्यापेक्षा सोप्पा उपाय आहे की .....
स्वताच्या मनाप्रमाने वागायाचेच नाही मग कोणाला पण त्रास नाही
आणी आपल्याला पण त्रास नाहीच नाही
आजकाल मी ठरवून टाकलय... की रडायाचे नाही
आपले अनमोल आसू उगीच वाया घालवायचे नाही
माझे आसू किती ताकदवान आहेत ते मला छान माहित आहे
मग त्यांना असेच उगा कशाला वाया घालवू?
मग लोकांना वाटते की मी दुबळा आहे...
मग ते मला हसतात ना मला
त्यांना माझ्यावर हसू द्यायचे नाही........
म्हणून मी ठरवून टाकलय... की रडायाचे नाही
मी ना ठरवतो खुप काही काही
पण जेव्हा वेळ येते ना प्रत्यक्षात आचरण्याची
तेव्हा मी ना सगळे विसरून जातो.....
कळतच नाही के काय ठरवलय ते
आणी मग काय सगळे मनोराज्यच रहाते
आणी मग मी स्वताच्याच मनाप्रमाणे वागतो
सहज पणे अगदी ढस ढसा रडतो

सुनील जोशी
२८/०४/२००९

No comments: