पडकं घर ...
मोडक्या भिंती
जपत परी होत्या
प्रेमाची नाती ...
बाबा निवृत्त
आई आजारी
दादा बेकार
ओढाताण फार
ओढाताण दिसायची
जेवायच्या ताटात
पण एकोप्याने
व्ह्यायची त्यावर मात...
दिवस पालटले ....
दादाची संपली परवड
प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून
त्याची झाली निवड ....
आता लोन मिळालघर
ही उभ झाल ...
गोरी गोरी पान
वहिनी पण आली
घर उभ झाल
त्याचं चांगभलं जहालं
पण प्रेमाचं नातकुठे
तरी हरवून गेलं
कुठे तरी हरवून गेलं .......
सुनील जोशी
१०/०४/२००९
Sunday, April 12, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment