Sunday, April 12, 2009

चारोळ्या

चारोळ्या

*****
आकाशीचे तारे अजुनी पुसती मला
का आजही आहे वाट येण्याची तिच्या तुला?
हळूच हसुनी ह्रदय हे बोले हळुवार....
सांग की ती सोडून गेली कधी मला ?

******

हास्याने अधरान्ना श्रुन्गारणे सोडुनी दिले
स्वप्नांनी चक्षुना सजविणे त्यजुनी दिले
आजकाल सखे उचकी ही येत नाही
का आठवणीत आणणे सखे तू मला सोडुनी दिलेस?

*******
सुनील जोशी
१०/०४/२००९

No comments: