Saturday, May 16, 2009

मन म्हणजे........

मन म्हणजे........
वेड
मर्यादा नसलेल
कुठल्याही थराला विचार करणार!!

माझ मनही तसच.....
सुखाचा क्षणात असताना
अचानक दु:खात कोसळणार
स्वप्नांचा डोलाऱ्यावर
नवीन विश्व बांधणार
आणि ......... एखाद्या वादलामुळे
अचानक कोलमडून पडणार!!

***************************
***************************

आठवणीचे, आनंदाचे काही क्षण ओंजळीत घेऊन प्रवास सुरु आहे... त्या ओंजाळीतुन काही क्षण गळुन पडतात तेव्हा वाटत..... आपणही असेच कधीतरी मातीत मिसळुन जाणार... पण नाही क्षणातच माझी रिती झालेली ओंजळ आनंदाने पुन्हा भरुन येते.. आणि माझा प्रवास सुरुच राहतो... जीवनाचा नागमोडी वळणाचा हा रस्ता मला फार आवडला प्रत्येक वळणावर नवीन स्वप्न, नवीन इच्छा, नवीन आकांक्षा, नवीन माणस...... कधी दुःख, कधी आनंद...... बर झाल ह्या रस्ताला वळण आहेत.. प्रवास किती राहीला,किती केला लक्षातच येत नाही.... कधी संपला अस वाटत तर कधी नुकतीच सुरुवात झाली आहे असही वाटत... उगवत्या सुर्याच्या पहिल्या किरणापासुन त्याला पुर्णपणे जगासमोर येताना पहायला मला आवडत... त्याला जड पावलांनी जगाचा निरोप घेतानासुद्धा पहायला आवडत... रात्रीच्या काळ्याभोर आभाळात चमकणाऱ्या...........

एक मित्राने पाठवलेल्या ह्या काही ओळी ..मला आवडल्यात ...आपणा सर्वांसाठी ...

No comments: