Sunday, August 16, 2009

वृद्ध......

आपले आई-वडील वृद्ध होतात.....!"
८० वर्षांचे वृद्ध गृहस्थ घरातल्या सोफ्यावर बसले होते.बाजूला त्यांचा ४५ वर्षांचा उच्चशिक्षीत मुलगा बसला होता.खिडकीत एक कावळा येऊन बसला.वडिलांनी मुलाला विचारलं''ते काय?''मुलगा म्हणाला''कावळा''काही वेळानंतर वडिलांनी पुन्हा विचारलं,''ते काय?''मुलगा म्हणाला''आताच सांगितलं ना कावळा आहे म्हणून''थोड्या वेळेनंतर वडिलांनी मुलाला पुन्हा तोच प्रश्न केला,यावेळेस मात्र मुलगा त्रासला होता.रागातच तो उत्तरला,''कावळा आहे कावळा!'' त्यानंतर चौथ्या वेळेस वडिलांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला.यावेळेस मुलगा वडिलांवर खेकसलाच'' पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारता? कितीवेळा सांगितलं कावळा आहे म्हणून? समजत नाही?''वडिल उठले.त्यांच्या खोलीतून एक डायरी आणली.मुलगा जन्मल्या दिवसापासूनच्या नोंदी त्यात होत्या.त्यातील एक पान उघडून मुलाला वाचायला दिले.मुलगा वाचू लागला,लिहिले होते'' आज माझा तीन वर्षांचा छकुला माझ्यासोबत सोफ्यावर बसला होता.खिडकीत कावळा येऊन बसला.बोबड्या स्वरात मला छकुल्याने २३ वेळा विचारलं,ते काय?२३ वेळा मी त्याला सांगितलं "कावळा". मुलाने वडीलाना मीठी मारली, त्याच्या डोळ्यात अश्रु आले.

Net Varun Sabhaar

5 comments:

mannab said...

This piece was known to me, but I appreciate that you have rightly reproduced. I have gone through some of your creations. Thanks a lot. Keep it up.
Mangesh Nabar

अपर्णा said...

हम्म खूप छान प्रसंग आहे आणि अगदी योग्य शब्दांत मांडला आहे. खरंच आई-वडिलांचा आपण त्यांच्या दृष्टिकोनातुन किती वेळा विचार करतो???

Asha Joglekar said...

Thodyach diwasat asa prasang mazyawar hee yenyachi shakyata aahe pan mee kahee ashi diary nahee lihoon thewaleli. Pan tumachi laghukatha chanach aahe.

sunnycool said...

good i liked it!!!!!!!!! sometimes in our busy schedule, we tend to forget about our parents n their contribution towards making us what we r today!!
keep it up

Anonymous said...

म्हणजे काय?
वडलांनी बदला घेतला की काय?

म्हातारचळ लागणे यालाच म्हणत असावेत बहुतेक!