Tuesday, June 23, 2009

अशीच असते.. ही कातर वेळ


आठवणी त्या तुझ्या नी माझ्या
येउनी दाटती ह्या अश्या अवेळी...
करुनी देती जाणीव मला गं ..की
कातर वेळ ही अशीच असते ....
चैन ना जीवाला ना विश्रांती
सुचे ना काही सैरभर मन ही
शोधू तुला की सावरू स्वताला
कातर वेळ ही अशीच असते ....
सखे तुझा विरह जीवघेणा
कसा मान्य करू कळेना
आयुष्याची सांजवेळ ही
तुझ्या विना ती साहू कशी मी
सखे गं...
खरच ...
कातर वेळ ही अशीच असते ....

सुनील जोशी
२३/०६/२००९

No comments: