मुक्तिबंध ... (सामाजिक कथा )
आभाळ भरून आलयं. कधीही बरसणारयं आता. माझे डोळे पण असेच भरून आलेले आहेत. जणू नातचं आहे त्या आभालाशी त्या माझ्या डोल्यांचं.प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध बंड पुकारून मुक्त झालेय मी. मुक्तीचा आनंद आहे की नको असलेल्या मुक्तिचं दुखः... खुप अस्वस्थ झालेय. खुप खुपच चुकल्या चुकल्या सारखं वाटतय. बरोबर केलं की चुकले मी ..काही काही कळत नाहीय्ये.
जीवापाड जपलेली नाती ... वर्षानुवर्ष जोपसलेली नाती ...खरचं का इतकी कचकड्याची असतात ही नाती? शब्दाच्या बाणान्नी इतक्या सहज का विद्ध होऊ शकतात ही नाती?
निर्णय ..निर्णय घेताना... का तुटतात ही नाती?
नाती जपावी की मन. नुसता गोंधळ उडून जातो. एक मन म्हणते ... बरोबर केलास तू ... ता लगेच दुसरं म्हणते .... इतकिशी पण तडजोड नाही करू शकत तू ... अगदी तुझ्या जन्मदात्या साठी?
"तू ऐकणार नाहीस तर मग?"..
"पण... पण... तुम्ही समजुन का नाही घेत ?"
"काय समजुन घ्यायचयं ? आणी का समजुन घ्यायचयं? आम्हाला पण काही कळत असेलचं ना? बाप आहोत आम्ही तुमचे. आता तुमच्या कडून समजावून घ्यावं लागेल नाही का?"
आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही?
धगधगत्या ज्वालामुखीचा जणू उद्रेक होत होता.
पण पिताजी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे...
तरतर ..आम्ही जणू तुझ्या आयुष्याचा होम च मांडलाय न...आम्हाला कुठं काही कळत तुझं भलं बुर ... आम्ही तुला सुलावरच तर द्यायला निघालेलो आहे ..नाही का?
पिताजी ... मी डोळ्यात पाणी आणून बोलले ...
कायं गं काय वाईट करतोय आम्ही तुझं ? सात पिढ्या बसून खातील एवढी प्रसन्न आहे लक्ष्मी. आणी तू बसली आहेस शिक्षण शिक्षण करत...
काय चाटायचं त्या शिक्षणाला? ..शिक्षण घेउन ही कमावणार आहात तो पैसाच ना.
पिताजी ... प्लीज.... प्लीज माझ्या मनाचा ... थोड़ा.... थोड़ा तर विचार करा ना पिताजी... मी
कळवळुन बोलत होते.
खुप जपलं तुझं मन ... बस झालं आता ... तुला शिकू दिलं ही चुकच झाली म्हणा...
हेच शिकवतं नाही तुमचं शिक्षण ... मोठयांची अवज्ञा कशी करावी ते....
आम्ही अशिक्षित बरे तुमच्या पेक्षा ...नसतील वाचली चार बूकं, तुमच्या सारखी ... पण हे मात्र कसं कोळुन प्यायलो आहे ...
"रघुकुल रीती सदा चली आयी , प्राण जाई पर बचन ना जाई ..."
वचन... वचन... वचन... तुमच्या वचनासाठी तुम्ही लावताय माझं आयुष्य पणाला... आणी दुहाई देताय कुलाची ... वाह वाह...
तू ऐकणार नाहीस तर ...
नाही नाही नाही ....
अगदी तलाक ..तलाक ..तलाक च्या धर्तीवर मी काप-या पण ठाम शब्दात व्यक्तले. जणू निकाह व्ह्यायच्या आधीच तलाक झाला होता तो. नंतर प्रलया नंतर ची भयाण शांतता पसरली जणू . माझ्या त्या तार सप्तकानंतर ..त्यांचा खर्ज लागला ....
" ठीक आहे तर मग... आजपासून तू आम्हाला आणी आम्ही तुला मेलो...."
काळीज चिरत जाणारे ते शब्द... त्या शब्दांनी वर्षानुवर्ष जपलेली ..जोजवलेली नाती ..क्षणात अस्तंगत झालीत..
आठवणीचे मेघ बरसू लागलेत. भरून आलेलें डोळे वाहू लागलेत.
पार मागासलेल्या भागात पण उच्चवर्णीय कुलात जन्माला आलेले मी.... त्यांची कन्या. आईच्या पोटात असतांनाच म्हणे त्यांनी वचन दिलं होतं. मुलगी झाली की तुमची सुन म्हणुनच ह्या घरात वाढेल. बैठकितच इसार म्हणून तीन हजाराची बिदागी पण दिल्या गेली.
पिताजिंची परिस्थिति डबघाईचीच होती. मरता क्या नहीं करता , ह्या न्यायाने....बुडत्याला काठीचा आधार मिळाला.
आईचे दिवस भरत आलेले होते. सकाळी सरकारी दवाखान्यात भर्ती व्हायचे बेत सुरु होते. पण अचानक कळा सुरु झाल्यात आणी कसला दवाखाना आणी कसलं काय ... दवाखाना राहिला दूर आणी मी जन्माला आले.....
मुलगी झाली हो .... आनंदाला उधाण आलं होतं नुसतं लक्ष्मी च्या पावलांनी प्रवेशाले होते जणू मी. खरच चमत्कार होता की काय देव जाणे पण दिवस पालटायला लागले होते म्हणतात . हाता तोंडाशी असलेली गाठ आता सुटायला लागली होती हळु हळु, आणी चार पैसे शिलकीत पण पडू लागले. पिताजिंच्या व्यवसायात अचानक बरकत येऊ लागली. लेकीचा पायगुण चांगला म्हणून लेक लाडाची ना ठरती तर नवलच.
भैया आठ वर्षाचा होता तेव्हा. एवढा मोठा झाला पण शाळेची पायरी नव्हता चढला अजुन . चढणार तरी कसा म्हणा... इथे रोजच्या जेवणाची भ्रांत ... शाळेचे चोचले! कसे परवडणार ना ? शिलकित चार पैसे पडताच पिताजिंचं लक्ष गेलं ते भैया कड़े. आणी मग त्या मानान थोराड असलेला भैया शाळेत जाऊ लागला.
मुळात कुशाग्र बुद्धीचा भैया... संधी मिळताच ना चमकता तरच नवल . त्याची यशोराधाना सुरु झाली आणी मग त्यान कधी मागे वळुन पाहिलच नाही.
आज आय आय टी मधून स्नातक होउन अमेरिकेत स्थायिक झाले भैया... पिताजिंनी पसंद केलेल्या , त्याच्याही बाल पणीच ठरवलेल्या , मुलीबरोबर लग्न करून तो आनंदात (!!) जगतोय. भाभी त्याला तशी कुठेच शोभत नाही. ना शिक्षणात, ना दिसण्यात , ना वागण्यात ना बोलण्यात... पण तरी निभावतोय तिच्या सोबत ...फ़क्त पिताजिंच्या शब्दाखातर..
लहानशीच होते मी. भैया शाळेत जायचा. त्याचा तो ड्रेस , बूट, टाय ... छान वाटायचं. पण मला आवडायचं ते त्याचं दप्तर , त्यातली ती छान छान चित्रांची पुस्तकं. मी घरातचं असायची. त्याच्या त्या पुस्तकाशी मैत्री करावी असं मला वाटायचं. पण भैया मला देत नसायचा ती पुस्तकं. मी रडून रडून मग गोंधळ घालायचे.
आताशा माझा गोंधळ वाढतच होता. एक दिवस आई पिताजिंच्या मागे लागली. अहो हिला सुद्धा पाठवायचे का शाळेत?
कशाला? ... पिताजिंनी त्रासिक मुद्रा करीत विचारलं ... आपल्यात ती रीत नाही . तिला तुम्ही घरीच शिकवा घरकाम ... तरबेज करा त्यात , तेच कामात येइल सासरी जाईल तेव्हा.
घरात तणाव वाढायला लागला होता. माझ्या रोजच्या गोंधळाने आई पार वैतागुन जायची. आईचा मग पिताजिंच्या मागे लकडा लावण, रुसवे, फुगवे ..आता रोजचचं झालं. मग काय वाटलं त्यांना कुणास ठाउक... माझी पण शाळा सुरु झाली.
कुशाग्र बुद्धि जणू खानदानाचा वारसाच आमच्या. मीच थोड़े त्याला अपवाद असणार!
अभ्यासात मी भैया सारखेच चमकत होते. काकणभर सरसच. चौथित स्कोलरशिप, सातवीत स्कोलरशिप आणी एस एस सी ला तर बोर्डात चक्क जिल्ह्यातून पहिली आले होते मी. त्यावेळी वृत्तपत्रातून फोटो छापून आलेत , मुलाखती छापल्या गेल्यात... मी एकदम आकाशातच होते.
अभिनंदन सुनबाई ... एक गलेलट्ठ गोलमटोल व्यक्ति चावडी वरुन आत येत येत बोलली. ते ऐकून पिताजी धावतच पुढे आलेत, आईने डोक्यावरून पदर घेतला, आणी जवळ पास
ढकलतच मला आत पाठवले.
तेवढ्या वेळात में त्या ध्यानाला बघून घेतले. प्रचंड गोलाकार ते व्यक्तिमत्व, चहू बाजूनी ओसंडून वाहणारी ती काया, वेष साधा खेडवळच, पण वस्त्र प्रावरण अत्यंत उंची, हातात सोन्याचं कडं, पाची बोटात अंगठ्या, गल्यात रुळणा-या माळा. आणी त्या प्रचंड देहाची उंची मात्र जेमतेम ५ फुट. असं ते ध्यान पाहून मला हसुच आवरेना. त्या बुटक्या आणी स्थूल देहावर श्रीमंती कशी ओसंडून वहात होती.
आई ..कोण गं हे? कसबसं माझं हसू आवरत मी कुजबुजले.
अगं ते सेठ धन्नामल, तुझे होणारे सासरे...
माझे सासरे? में एकदम स्तंभित झाले ? कधी गं ठरलं माझं लग्न? आणी कोणी ठरवलं? मी तर कधीच पाहिलेलं नाही ह्यांच्या मुलाला... त्यानी कधी बघितलं आणी मला? काय करतात ह्याचे चिरंजीव? आणी कुठे असतात ते?
माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीने ती माऊली एकदम हडबडली... आणी मग क्षणात स्वताला सावरत बोलली ... किती किती हे प्रश्न? आणी मग एक उसासा ताकत बोलली ... चल आटप लवकर लवकर... आता जरा कामाला लाग ... सांगेन मी नंतर...
मी अजुनही त्या धक्यातुन सावरले नव्हते
सेठजी निघून गेलेत. मला खुपशी अस्वस्थ करुनच.
बाबा मात्र एकदम खुष दिसत होते. त्यांच्या आनंदाला जणू उधाण आलेलं ... लगबग लगबग सुरु होती नुसती त्यांची. त्यांनी सगल्यान्ना बोलावलं आणी उत्साहात सांगू लागलेत.. सेठजी खुप खुष आहेत आपल्या बिटियावर, ते म्हणताहेत आता लवकर चा मुहूर्त धरा.
मी अजुनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. मी निरागस पणे बाबांना विचारलं ...
पिताजी कधी आणी कुणी हो ठरवलं माझं हे लग्न?
अगं तू जन्माला यायची सुद्धा होतीस तेव्हाच बांधल्या गेल्या आहेत ह्या गाठी. पिताजी उत्साहान सांगत होते.
हं ... मी एक थंड निश्वास सोडला ...
पिताजिंच लक्ष पण नव्हतं माझ्याकड़े , ते उत्साहनं सांगत होते , नाव काढलं आपल्या लेकीन. नशीब फळफळलय बघा आपलं. येवढं कार्य झालं की मी मुक्त होणार .
पिताजी एक विचारू ....
त्यांच्या उत्साहाच्या चौखूर उधळलेल्या वारू ला लगाम घालत जणू मी बोलले ,
डोक्यावर आठ्या घालत ते हुंकारले.... हूं .....
त्यांना असं मधेच अडवलेलं बहुदा रुचलं नसावं .
पिताजी काय करतात सेठ्जींचे चिरंजीव ? काय वय आहे त्यांचं? आणी काय शिकलेले आहेत ते? कसे दिसतात ते? एखादा फोटो मिळेल का बघायला?
किती प्रश्न हे... आणी किती ही उलट तपासणी.
अगं इतकी प्रसन्न आहे लक्ष्मी त्यांच्या वर ..की बाकी सगळ त्या पुढे गौणच. साथ पिढ्या नुसतं बसून खाल्ल तरी शिग नाही उतरणार , खुप हौशी आहेत , शौकीन पण . शिक्षण शिक्षण काय घेउन बसली आहेस ... न शिकताही सुखी संसार करतोच आहे की आम्ही पण... मुलाचं वय वगैरे नसते हो बघायचं ... घोड़ा और मर्द कभी बूढ़े नहीं होते...
पिताजी उत्साहनं बरच काही सांगत होते आणी त्यांचे ते शब्द जणू माझ्या कानात तापलेलं शिसं ओतल्या सारखे घुसत होते . में सुन्न झाले ..बधिर झाले ... कसंबसं स्वतःला सावरत अगदी म्लान स्वरात पुटपुटले ...
मला वाटते पिताजी ..मला नाही जमणार हे लग्न...
काय???? पिताजी तार सप्तकात खेकसलेत ...सगळ्याचा थरकाप उडाला ....
जादा माज आलाय का? फार चूर चूर चालतेय जीभ ... कापून काढीन ... म्हणे जमणार नाही. बघतोच तर असं कसं नाही जमत ते ... हां काही बाहुला बाहुलिचा खेळ वाटतो की काय तुम्हाला ... आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही?
शब्द ..शब्द ..शब्द ... मला विचारलं होतं का कधी देतांना असा शब्द ...
असा शब्द देऊन माझ्या जिंदगिचा असा लिलाव केलात तुम्ही ... काहीच नाही वाटलं तुम्हाला पिताजी ? मी अत्यंत निरागस पण ठामपणे विचारत होते
नालायक ... थोबाड वा करून बोलतेस बापाशी... काही लाज शरम...
आता माझाही संताप वाढू लागला होता ...
पिताजी ..माझं हे साधं बोलण जर नालायकपणा असेल तर ..हो मी आहेच नालायक ...
" ऐकणार नाहीस तर मग तू .... "
खुप इच्छा होतेय ..भैय्याशी बोलावं ... त्याला सांगावं ... पण तो काय करणार आहे ..काय करू शकणार आहे ... तो कसली साथ देऊ शकणार .. शब्द बंधनात त्याचं ही आयुष्य उधळुन गेलय त्याचं ..स्वतः ला नाही सावरू शकला ..मला काय साथ देणार ...
माझ्या कालिंदीच्या डोहालाच सांगते मी माझं हे गुज ... तो तरी करेल ना जवळ मला... मुक्त झाले आहे ना मी ..की परत बंधनात अडकत चालले आहे मी ... काही समाजात नाहीय्ये ...
सुनील जोशी
२२/०६/२०११
No comments:
Post a Comment