Saturday, November 15, 2008

आजकाल ...
आजकाल मी ठरवून टाकलय...
मी ठरवून टाकलय की ...
साधू संत आणी साध्वींच्या नादी लागायचे नाही...
त्यांच्या प्रवचनाला आणी कीर्तनाला मु ळी च जायचे नाही...
रस्त्याने जाताना चुकून कुठे त्यांचे प्रवचन, कीर्तन सुरु असेल
तर आपला चेहरा घट्ट बांधून घ्यायचा ,
लपवून ठेवायचा.......
त्यांच्या प्रवचन कीर्तनात आपला चेहरा कुट्ठे कुट्ठे दिसू नये ...
फोटोत ...ह्याची काळजी घ्यायची...
का? माहिती आहे??
उद्या कुठे बॉम्बस्फोट झाला .....
ह्यांच नाव आल .....
ए टी एस ची चौकशी सुरु झाली .....
आणी त्यांच्या प्रवचनात माझा फोटो दिसला तर....
तर लागेल ना माझ्या मागे ससेमिरा ए टी एस चा...
अरे भारतीय लष्कराला नाही सोडल त्यांनी
तिथे मी किस झाड़ की पत्ती.....
तसा मी माराला नाही घाबरत ....
पण बदनामी नको हो ....
एक साधा मध्यमवर्गी नाकासमोर पाहून चालणारा मी
त्यामुले ठरवून टाकलय मी....
आजकाल ठरवून टाकलय मी .....

1 comment:

Unknown said...

saheeeeeeeeeeeeeeeeeeeee re!!!!!!!!!!!!!!!