Sunday, April 12, 2009

अधर स्पर्श .....

अधर स्पर्श .....
नव यौवना तू षोडष वर्षा प्राप्त
मदमस्त चाल ती तव गजगामिनी सम्प्राप्त
भुलविशी कितिका त्या तव नाजुक नखर्याने
सांडीती काळीजे कितिक जाशी ज्या मार्गाने
रूप लावण्य कितिक ते तव वर्णावे ...
शब्दाना ही पडती मर्यादा स्वभावे.....
बोलता सखे तुज सवे.. लक्ष असे
सतत तव तय नाजुक अधरांकड़े
विलग होता तव अधर कथण्या काही
अधरची जाई की काळीज लकाकुनी
सहजची दाटे भाव मनात
कधी होशील माझी, मी तृषार्त
कधी येइल क्षण मिलनाचा
तू अन मी एकरूप होण्याचा ...
अन् मग त्या मिलनाच्या क्षणी
अधरांनी अधरान्ना अधर स्पर्शीले
अधरची मग तन मन रोमांचित

सुनील जोशी
११/०४/२००९

No comments: