Friday, February 27, 2009

I Love You नंतर काय

मध्यंतरी एक गंमत झाली ....
माझ्या एका मैत्रीणीचा मला फोन आला .....
स्वरात एकदम प्रचंड काळजी....
अरे मी फारच तणावात आहे .... का ग काय झालय असे?
अरे माझा मुलगा आता मोठा झाला की रे...
म्हणजे मला कळले नाही?? आणी मग तो मोठा झाला तर तुला का टेंशन ?
अरे काय सांगू तुला ...तो मला परवा विचारत होता ....आई तुला एक विचारू?
मला कलेच ना अस का म्हणतोय हा.... अरे विचार की बिनधास्त .....
पण बाबाना नाही ना सांगणार तू ? त्याची शंका ...
मग मी पण थोडीशी सतर्क झाले .... पण अगदी आश्वासक स्वरात त्याला बोलले ...
बोल बाला बोल .... मग थोड़े इकडे तिकडे बघत तो म्हणाला .....
आई I Love You च्या पुढे काय असते ग?
म्हणजे.....? मला नाही कळले? काय विचारायचय बाळ तुला?
अग आई ती स्वीटी माहिती आहे ना तुला आमच्या ग्रुप मधली ....
ती ना मला आवडते ..... आणी मग मी तिला म्हणलोय की I Love You ....
आता ती ना माझ्यापेक्षा थोड़ी मोठी आहे .... पण दिसते मात्र एकदम मारू....
मला खुप आवडते .... पण मी १४ फेब्रुवारी ला तिला sms पाठविला ना तेव्हापासून ना ती मला टाळते आहे बघ .....
आई मी काही चुकलो का? मला ना काहीतरी चुकलय अस वाटतय.....
अग आई I love you बोलल्या नंतर जर कोणी आपल्यावर रागवत असेल ...
आपल्यापासून दूर जात असेल तर मग काय करावे ग?
हे Love इतके ख़राब असते का ग?
आता मात्र मला कलेच ना की काय सांगू मी ह्या मुलाला ?
प्रेम ही भावना कळन्याचे वय हलूवार पणे खुलन्याचे हे वय....
आणी ह्या मुलाला अस वाटतय?
अरे अस काही नसते .... ती ना लाजली असणार ...आणी म्हणून टाळत असेल तुला...... बघ.....
नाही ग ... ती ग्रुप ला येते पण माझ्याकडे बघत पण नाही ....
अग सांग ना ममा..... काय असते I Love you च्या नंतर ....
आता मात्र मला एकदम हलल्या सारखे झालं ....
अरे मी चाचपडत बोलले .... बाळ आता असू दे ....
मी निशब्द आणी तो आश्चर्यचकित ....
सांग ना सुनील काय सांगू त्याला रे I Love You नंतर काय ते माझा मुलगा खरच रे मोठा झाला का?
अरे खरच का असते काही Love नंतर ....