Sunday, July 10, 2011

हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण

हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण

‘जिजाबाई निरक्षर होती; पण तिने शिवप्रभू घडवला. आजच्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ,
उच्चभू स्त्रीने शिवाजीच्या पासंगाला पुरेल, असा एक तरी पुत्र दिला आहे का ?

त्या आजीचे वय आहे ८५ वर्षाचे. त्यांची दृष्टी अजूनही उत्तम आहे. श्रवणही
चांगले आहे. ऊस खाता येईल, असे दात आहेत. शरीर तसे धडधाकट आहे. त्या घरकाम आणि स्वयंपाकसुद्धा करतात. त्यांचा वीस वर्षे वयाचा नातू आजीची थट्टा करण्याकरता विचारतो,

आजी, पृथ्वी सूर्याभोवती का फिरते ?
आजी : अरे, सूर्य नव्या रुपयासारखा चमकतो ना म्हणून. सगळी दुनियाच रुपयाभोवती फिरते ना. पृथ्वीचा काय अपराध ?
नातू : अरे वा ! आजी तू खूप शिकलेली आहेस.
आजी : छे ! छे ! असले काही अभद्र बोलू नकोस. मी चुकीचे सांगितले का ?
नातू : आजी, तू अगदी खर तेच सांगितलेस; म्हणून तर मी विचारले.
आजी : खरे बोलायला शिकण्याची काय गरज ? शिकावे लागते, ते खोटे बोलण्याकरता. पत्रकार,
शिक्षक, डॉक्टर, व्यापारी असे सगळे परदेशात शिकायला जातात, ते लोकांना भुलवून अधिक पैसे कसे उपटता येतील, याकरताच ना ? तिथे खोटे बोलावे लागते. भारतातल्या शिक्षणाने तसे लोकांना चांगले फसवता येत नाही. परदेशातल्या शिक्षणाने तो खोटे बोलण्यात विलक्षण कुशल होतो. (गंभीर वाणीने) खरं बोलायला शिकण्याची आवश्यकता नाही. गुन्हेगाराला, खुनी माणसाला पाठीशी घालायचे असेल, तर खोटे बोलावे लागते. रुग्णाकडून जास्त पैसे उकळण्याकरता वैद्याला खोटे बोलावे लागते. लोकांना फसवून आपला माल त्यांच्या गळी उतरविण्याकरता व्यापार्‍याला खोटे बोलावे लागते. श्रीमंत वडिलांच्या मुलाकडून पैसे उकळण्याकरता शिक्षकाला खोटे बोलावे लागते. त्याकरता शिकावे लागते. खरे बोलणार्‍याला शिकण्याची काय गरज ? खरे बोलणार्‍याच्या
जवळ केवळ हृदय हवे आणि तेच तर शिक्षणाने हिरावून घेतले आहे ना !

आंतरजाला वरुन साभार .....

Sunday, July 3, 2011

बस्स झालं... आता... मी बोलणार ...

मला खुप खुप काही बोलायचं आहे. खुप काही सांगायचं आहे. सुरुवात कुठून करू ... काही कळत नाहीय्ये. बाबांच्या कड़क शिस्तिबद्दल सांगू , की आईच्या अवास्तव अपेक्षां बद्दल , ताईच्या हुशारिबद्दल बोलू की आजी अजोबंच्या So Called लाडान बिघडलेल्या माझ्याबद्दल.... डोक्यात प्रचंड गोंधळ उडालेला आहे ... पण आज अपुन बोल के रहेगा... जादा सोच सोच के साला दिमाग का दही हो रहेला है ...

आशय अभिमन्यु पांडे . वय वर्ष १८ पूर्ण . लोकशाहीत मतदानाचा अधिकार प्राप्त. यंदाच १२ वी पास झालोय . दहावी बारावी दोन्ही CBSE pattern मधून केल्यात. अत्यंत कुशाग्र बुद्धीचा .. पण... हा पणच सगळा गोंधळ करतो ना .... दहावी ला ८९ % टक्के मार्क्स मिळालेत . एवढे मार्क्स मिळाले की सायंस च करायचं असतं ... आमच्या कड़े घर काम करणार्या रखमा बाई चं पण हें ठाम मत... उमलत्या कळीन कसं उमलायाचं ..माळी परिवार ठरवणार ....
अरे मुली सारखी मुलगी .. ती .. तुझी कृतिका ताई ... तिला जमते ..आणि तुला नाही जमणार ? ते काही नाही .. मुळीच ऐकणार नाही काही. तुला काही कळत नाही ... मी सांगते आहे ना ... तुला सायंस च घ्यायचय... आणि दिलय ना देवाने डोकं ..त्याचा कर रे वापर.... इति महामहिम मातोश्री ...

ए गधड्या... जास्त अक्कल नाही पाजळायची ... तू आपले पेपर सोडवतान्ना वापरतोस तेवढी पुरे आहे . म्हातार्यानी जास्ती लाडावून ठेवलय ना ... माजोरडा कुठला ... म्हणे सायंस नाही घ्यायचं ... भिकेचे डोहाळे लागलेत का? ... जास्ती आवाज नाही पायजेल ... गप गुमान सायंस ला एडमिशन घ्यायचे ..समजलं का? नाही तर फिर मै हु और तू है ... प्रचंड डरकाळी फोड़त पिताश्री गरजलेत.

ए शहाण्या ... काय लावलाय? का असा त्रास देतोय सर्व्याना? आपण अभ्यास केला ना की जमते सगळ. का छळतोस ... एवढे सगळे म्हणताहेत तर घे की एडमिशन सायंस ला. तुला काही कळत की त्यांना रे ... यूज लेस फेलो ... इति वंदनीय कृतिका ताई ...

का रे बाबा असा छळतोस? काय घोडं मारलय आम्ही तुझं ...कुठल्या जन्माचा वैरी आहेस रे... चार शब्द काय गोड बोललो ... की लगेच पलट्लास... सगळे कसे टोचू टोचू बोलतात रे आम्हाला ... ऐक रे ऐक जरा त्यांचं ..सायंस तर सायंस ... घेउन टाक रे एकदाची एडमिशन ....नको रे बोल लाउस उगा ह्या म्हातारपणी .. थकलो रे आता ... रामकृष्ण हरी... करवादत आजोबा बोललेत...

खर तर मी कलेचा भोक्ता . पाना फुलात, प्राण्या पक्षात रमणार मी... कळी उमलताना बघून आनंदाने नाचणारा मी ... समाजातल्या घटनांवर चिंतन करणारा मी ... निसर्गाच्या किमयेने चकित होउन व्यक्त होऊ पहाणारा मी.. त्या किमया ..त्या गोष्टी ... भुलावतात मला ... आणि मग सगळ्यानि कट केला ... अन त्यात माझ्या त्या दहावीच्या मार्कान्नी घात केला... जखडून टाकलं ह्या सगळ्यानि मला त्या नियमबद्ध वैज्ञानिक परिघात.

सगल्यांच्या आग्रहाखातर ... एकदाची सायंस ला एडमिशन घेतली . आणि पुढच्या दुष्ट चक्राला सुरुवात झाली . आई ने चंग बांधला ह्याला इंजिनियर च करायचा ... बाबांची त्याला सम्मति होती अर्थातच ... ताई आता तिकडे लांब होती ..पण दुरून तिचा रिमोट कंट्रोल सुरु होताच . ११ वितच माझ्या त्या ट्यूशन सुरु झाल्यात ... सकाळी ६ ते संध्याकाली ८ पर्यंत बिझिच बिझी. JEE , AIEEE , SEE, BITSAT चे क्लासेस पार थकून जायला व्ह्यायचं .

एक स्वभाव आहे माझा ...कदाचित दुर्गुणच म्हणा ना ... नाही म्हणता येत नाही मला ... कदाचित त्यामुळे ...येवडा थकून सुद्धा मी परत दुसर्या दिवशी सकाळी तयारच असायचा ट्यूशन ला जायला...
तसा दुर्गुणाची खाणच मी ... कोणी ही मोट्ठ्या आवाजात बोललं की घाबरून जाणे हां एक अजुन अवगुण. सरळ गोगल गाई सारखा कोशात चालला जातो मी. विशेषतः बाबा ...ते सुरु झालेत की ...मी कोमेजुन जातो . कसले ओरडतात. आतून म्हणावसं वाटते ...राहू द्या ना बाबा आता वाजले की बार .. (अर्थात आमचे हो). त्यांचं असतही बरोबर कधी कधी ... पण ह्याचा असा तर काही अर्थ नाही की आरडा ओरडा करुनच सगळ सांगावं ? आपली गोष्ट पटवून द्यायची एक पद्धत असते ना.. हीच ह्यांची पद्धत ... सतत हम करे सो कायदा वाली.. शुद्ध दादागिरी ... Autocratic Management का काय म्हणतात ना तसं जगायाची सवय झाली आहे आता

ही आमची मम्मी उर्फ़ माँसाहेब .. ह्यांची एक ठाम समजूत ... मी म्हणजे एक कुक्कुलं बाळ. मला काही समजतच नाही . तसा चार लोकात वावरतो मी पण ... पण सगळे कसे मला फसवायालाच टपलेले आहेत ..मला कळतच नाही आणि ते ... बिचारा मी... स्वताचा कुठलाच निर्णय घ्यायला मी लायक नाहीय्ये. चार लोकात सतत माझी लाज काढ़ते. सतत दाखले देते त्या कृतिका ताईचे ... ती कशी स्मार्ट आणि मी कसा वेंधळा हें सांगते अगदी आवर्जुन. I hate this comparison. I too am an individual entity. No one ..literally no one understand this. मग मला काही बोलावासच वाटत नाही. माझ्याकडे पण सांगायला खुप काही आहे ... पण ह्या ..ह्या उमलण्याच्या वयातच पार कोमेजुन गेलोय मी. कोणी समजावून सांगेल का ह्याना ...

आता हें पात्र ...कृतिका अभिमन्यु पांडे ... आमची ज्येष्ठा ...माझ्या लेखी ..ताईटली... चार वर्ष आधी जन्माला काय आली ..जणू सगळ्या जगाला शाहाणपणा शिकवायचा ठेकाच मिळाला जणू हिला. मी हिटलरला नाही भेटलो ..तो मेला म्हणतात ..पण मला खात्री आहे त्याच्या पुनर्जन्म झाला ह्याच घरात .. अभिमन्यु पांडे कड़े ... त्याच घरात मी पण जन्मलो ..एक ज्यू म्हणून ... अनायासे हिटलर ला छळ छावणित एक ओकारू सापडले . जगणे दुश्वार केलय ... आता जरा दूर काय गेलिये नोकरी करायला ... मी सुटकेचा निश्वास सोडला ..पण कसचं काय ... तिथून माँ साहेबांच्या मार्फ़त On Line छळ वाद सुरूच आहे ...

आजी आजोबा असतात घरात ... आई बाबा घरी नसले की आजी बोलावते हळूच ... हे हवय का ..ते घे रे ..करते थोडेसे लाड .. तेवढेच चार क्षण सुखाचे. A good old lady ... पण आई बाबा घरी अस्लेट की जणू त्यांच्याही प्रेमाचा झरा कसा आटून जातो. Poor Old Fellows.

बारावी सायंस झालो . स्वभावानुसार स्वताला झोकुन दिलं. पण एक नियति पण असतेच ना . किती हुशार असो ..पण नेमके त्या वेळेवर काय होते त्या वर खुप काही असते अवलंबून . रात्र रात्र जागुन अभ्यास केला. परीक्षेचा पेपर समोर आला ... आणि ऐन वेळी काही आठवेच ना. त्या पेपर मधले ते प्रश्न ओळखीचे वाटेतच ना. जणू आफ्रिकन आदिवासी माझ्या डोक्या भोवती फेर धरून आदिवासी नृत्य करू लागलेत .

पाच मिनिट डोळे बंद करून बसलो. देव आठवलेत . डोळे उघडून परत पेपर बघितला . आता थोड़ा ओळखिचा वाटला. ती अफ्रीकन भूतं थकली असावीत बहुतेक .. हळु हळु ताळ्यावर आलो .. पेपर सोडवायला लागलो .. सोडवत गेलो ..सोडवत गेलो ... वार्निंग बेल ..मग शेवटची बेल ... पेपर पूर्ण नाही झाला .. अपेक्षित यश नाही मिळू शकलं ... ना धड पास ना नापास ... चक्रव्युव्हात सापडलेला अभिमन्यु जणू ( इथे अभिमन्यु चा पुत्र..)

पेपर देऊन परत येत नाही तोच टोमणे सुरु. On Line पहिला टोमणा ... आळस नुसता आळस. चांस होता ..हुकवलास. आता बस भांडी घासत ... माँ साहेबांचा एक रिमार्क ... हाताने घालावलिस संधि .. बाबांसमोर उभे रहायची हिम्मतच नाही झाली . त्यांचं नक्की एकच वाक्य असणार ..खात्री पूर्वक .. खाऊन खाऊन माजला आहेस ..सांड नुसता ..कधी येणार अक्कल देव जाणे .
आता असं अपयश आलेला का मी एकटाच आहे? पण ह्या अघटिताची जबाबदारी तर मलाच घ्यावी लागणार ना. खरं तर जी माझी वाट नव्हती त्या वाटेवर मी मार्गक्रमण केलं. पाय रोवायची धडपड़ पण केली .... नव्हे माझ्या परीने यशस्वी पण झालो ... शिखर नाही गाठू शकलो ...ह्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो ... यशाचे सगळे वाटेकरी..पण अपयशाचा मी एकटाच धनि .. असचं जर जगण असेल प्राक्तनात ..तर काय अर्थ आहे ह्या जगण्याला .. का करायचं हे सगळ?
आता मी ठरवलयं ..बस आता नाही करणार हे सगळ ... नाही जगणार असलं बंदिस्त आयुष्य . झुगारून देणार ही सारी बंधन .. मुक्त होणार आहे मी ... आता बोलायला लागलोय ... आता करून पण दाखवणार आहे मी... बस ..बस ..बस..

बस्स झालं... आता...

सुनील जोशी
२६/०६/२०१०