पैदास उकिरड्यावरची .....
मी ललिता लीला निर्नाम ....पैदास माझी उकिरड्यावरची
तसा उकिरडा बराच असेल म्हणा ....
लहानशी होते...कळत नव्हतं फारसं ....
मामा ..मामाच म्हणायचे त्याला
तो काही काकांना घेउन यायचा
मेक अप केलेली माझी आई...हसत आतल्या खोलीत जायची
काकांना घेउन........पडदा ओढून घ्यायची .....
मी रात्री खेळत बसायची
बराच वेळ मझ्यासारख्याच
त्या माझ्या मैत्रीणी ....
त्या काकांचं तोंड झाकलेलं
आई हसत त्याना बाहेर सोडून यायची ...
बरेचदा मला कुशीत घेउन मग
रडत बसायची.......
बऱ्याच उशिरा मेक अप काढायची...बिना मेक अप मधली ती
ती आईच मला आवडायची ...ती मला माझी आई वाटायची....
सुनील जोशी
१५/१२/२००९
क्रमशः

शाळा शिकली ....
मामा तसा चांगला होता
आईने जवळच्या टाकलेल्या शाळेत
मला आणि आम्हा सगळ्याना
सोडून आणून देत होता...
मी ज्या शाळेत जायचे
तिथल्या बाई छान होत्या
पण तो मास्तर ना जरा
ना जरा वेगळाच होता ...
तो मास्तर मला त्या काकांसारखा
वाटायचा .....आमच्या पैकी काहिना खुप मारत
बसायाचा ...आणि काही ताया होत्या त्यांचे ना
लाड करायचा .....शाळेनंतर त्याना अगदी जवळ घेउन
कुरुवाळायाचा.....
त्या मास्तरची म्हणे नंतर तक्रार झाली
तो गेला
आणि त्याच्या सोबत बरय्याच ताया पण
गेल्यात ...
मागे कळालं की त्या मास्तरचा पण मामा
झालाय....
सुनील जोशी
१६/१२/०९

काकाची ती नजर
दिसा मासी होते मी वाढत
नकळत होते शरीर आकारत
येणार्या पथिकाच्या ओढाळ
नजरेला होते आव्हान देत .....
जवळच्याच शाळेत शिकत शिकत
ग म भ न सहज होते मी वाढत
आणिक त्या दिवशीच्या त्या
काकाची ती नजर..........चवतालूंन उठांया आईसी कारण
आईचे ते चवताळणे .....भिग्या बिल्लिचे ते शेर होणे
आपुल्या पिलाचे करण्या संरक्षण
रण रागिणिचे ते अवतरणे
काय रे भ****आणि मग ते भांडण ....अन् मग एकदम सहमणे
आणि मग एकदम ते शांत होणे
कदाचित ते तिचे समजणे......जाहली मुक्त करण्याची वेळ
पिल्लाला पंखाखालुनी .....
सुनील जोशी
१७/१२/०९

धाड़......
त्या दिवशी शाळेतून घरी येत होते
गल्लीच्या तोंडाशीच नीळी मोट्ठी गाडी उभी
काहीतरी गड़बड़ असावी ख़ास......
बाजुच्या गल्लीतुन मनी मावशी ...तिला ओढत नेत होते
तिचे कपडे धड नव्हते अंगावर
तिच्या मागुन तिची म्हातारी
बोम्बलत येत होती ...शिव्या शाप देत होती
कडाकडा बोटं मोडत
त्यांच्या मागे तीन गब्रू जवान
चेहेरे झाकलेले ..पण गळ्यात साखळी
पिवळी धम्मक दिसत होती ....त्यांना नव्हत कोणी पकड़लेलं ....दोन पोलिशीण बाया लांब उभ्या ....हसत खिदळत होत्या त्या तिघा बरोबर
एवढ्या गडबडित मामा मात्र दिसला नाही
ऐन वेळी बरोब्बर गायब झालेला ....
मी मग मागच्या मागे गायब
दोन तास भटक भटक भटकले
थोड़ा अंधार पडाया लागल्यावर
घराकडे वळले ......
सगलं कसं शांत शांत होतं आता
आईने आज मेक अप नव्ह्ता केला
गर्दी पण जरा कमीच दिसत होती...
धाड़ पडली होती म्हणे...
सुनील जोशी
१७/१२/२००९

तो दिवस....
आणि तो दिवस उजाडला ....
संध्याकाळी परसदारी
सागरगोटे खेळत होते मी एकटीच ...
मधेच तो आला ...माझ्या बाजुला येउन बसला
आणि वर उडालेल्या बिट्ट्या
हवेतच झेलल्यात वरच्यावर....
खूंखार.... लोचट त्याची नजर ...माझ्या तोंडून आपसुक निघालं ....भो ****
त्याच वेळी आईचं ही लक्ष गेलं
ती आतून बाहेर आली ..रागान..तरातरा ...
आणि चिडलेला तो मला चिमटा घेउन
नको त्या ठिकाणी ...पळुन गेला ...
मी कळवळले ...आणि तितक्यात
आईने ही दिली एक मुस्कटात ...
अन मग मला एकदम जवळ घेतलं
हमसाहमशी रडायला लागली ...
तो दिवस मग कळवळण्यातच गेला...
सुनील जोशी
१८/१२/२००९

रवानगी....
आता हे रोजचेच कळवळणे
मग त्याचा खुप त्रास व्हायचा
मला...आणि माझ्यापेक्षा तिला ....अंमळ जास्तच ....
काकांच्या नजरा...माझी सुधरती! भाषा ....आणि कसले कसले ... प्रोब्लेम न...तिने मग निर्णय घेतला ...तिच्या आयुष्यातला कठीण निर्णय ....
मग माझी रवानगी हॉस्टल ला केली
पाठवणीचा मुहुर्त! ठरला ....पाठवताना तिच्या डोळ्यात ....तिच्या उरात ..खुप दाटून आलं असावं...
दाखवत नव्हती ..वरवर ....आतून मात्र रडत होती खुप
माझी आई........
ती यायची मला भेटायला
पण हॉस्टल च्या आत येत नव्हती ...बाहेरच भेटायची ...आधी आधी दर आठवड्याला यायची...
मग हळु हळु २ आठवडे ..मग महीना
आणि आता बरेच महीने झालेत ...
माझ्या टेबल वर हां फोटो दिसतोय ना
ती माझी आई ....बिना मेक अप मधली ...माझी आई ...
सुनील जोशी
१९/१२/२००९

उपसंहार .....
आता मला आई तशी आठवत नाही.....म्हणजे भेटायला यावी अशी ....तिला माझ्या हृदयाच्या कवाडात
बंद करून जपून ठेवलय....ती आता भेटू शकणार नाही हे समजुन
समजूत काढून घेतलीये मनाची...
मागे एकदा मामा दिसला होता मार्केट ला
त्याने सांगितले की ....आता पर्यंत ती संपली पण असेल
हे एक बी रुजलं ..अंकुरलं ....आणि उकिर्ड्याच्या बाहेर फोफावलं
हे बघून ती सुखिया जाहली ....
पण मनाच्या त्या कोपरयात त्या स्मृति
आणि त्यात अजुनही आहे माझी ती आई
बिना मेक अप मधली ...माझी आई ...
सुनील जोशी
२७/१२/२००९
पूर्णविराम